मूल पाठ Prayer text
आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा । चरणरजातळीं द्यावा दासां विसावा, भक्तां विसावा ॥
जाळुनियां अनंग । स्वस्वरूपीं राहे दंग । मुमुक्षुजनां दावी । निज डोळां श्रीरंग ॥
जया मनीं जैसा भाव । तया तैसा अनुभव । दाविसी दयाघना । ऐसी तुझी ही माव ॥
तुमचें नाम ध्यातां । हरे संसृतिव्यथा । अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ॥
कलियुगीं अवतार । सगुणब्रह्म साचार । अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ॥
आठां दिवसां गुरुवारीं । भक्त करिती वारी । प्रभुपद पहावया । भवभय निवारी ॥
माझा निजद्रव्यठेवा । तव चरणरजसेवा । मागणें हेंचि आतां । तुम्हां देवाधिदेवा ॥
इच्छित दीन चातक । निर्मळ तोय निजसुख । पाजावें माधवा या । सांभाळ आपुली भाक ॥