मूल पाठ Prayer text
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं ॥ अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥ वारी वारी जन्म मरणातें वारीं ॥ हारीं पडलों आतां संकट निवारीं ॥ १ ॥
जयदेवी जयदेवी महिषासुरमथनी ॥ सुरवर ईश्वर वर दे तारक संजिवनी ॥ ध्रु० ॥
त्रिभुवन भवनीं पाहतां तुजऐशी नाहीं ॥ चारी श्रमले परंतु न बोलवे कांहीं ॥ साही विवादितां पडले प्रवाहीं ॥ तें तूं भक्तालागीं पावसि लवलाहीं ॥ २ ॥ जय० ॥
प्रसन्न वदनें प्रसन्न होसी निजदासा ॥ क्लेशा पासुन सोडीं तोडीं भवपाशा ॥ अंबे तुज वांचून कोण पुरवील आशा ॥ नरहरि तल्लीन झाला पद पंकजकोशा ॥ ३ ॥ जयदेवी० ॥