मूल पाठ Prayer text
लवथवती विक्राळा ब्रह्मांडमाळा ॥ विषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥ लावण्य सुंदर मस्तकीं बाळा ॥ तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझूळा ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ॥ आरती ओवाळूं तुज विश्वंभरा ॥ जय दे० ॥ १ ॥
कर्पुर गौर भोळा नयनीं वीशाळा ॥ अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥ भस्माचें उधळण शितिकंठ नीळा ॥ ऐसा शंकर शोभे उमा वेंल्हाळा ॥ जय० ॥ २ ॥
व्याघ्रांबरफणिवरधर सुंदर मदनारी ॥ पंचानन मुनिजनमनमोहन सुखकारी ॥ शतकोटीचें वीज वाचे उच्चारी ॥ रविकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जयदे० ॥ ३ ॥