मूल पाठ Prayer text
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा । त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा । नेति नेति शब्द नये अनुमाना । सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता । आरती ओवाळितां हरली भवचिंता ॥ धृ ॥
सबाह्य अभ्यंतरी तूं एक दत्त । अभाग्यासी कैंची कळेल ही मात । पराही परतली तेथे कैंचा हा हेत । जन्ममरणाचा पुरलासे अंत ॥ २ ॥
दत्त येऊनियां उभा ठाकला । सद्भावे साष्टांगेसीं प्रणिपात केला । प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥ ३ ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हारपलें मन झालें उन्मन । मी तूं पणाची झालीं बोळवण । एका जनार्दनी श्रीदत्त जाण ॥ ४ ॥