॥ वसुधैव कुटुम्बकम् ॥One earth. One family.
PujaOnlineDEVOTION WITHOUT BORDERSFind a practitioner

Aarti Sangrah Marathi

युगे अठ्ठावीस

Yuge Atthavis

पंढरपुर की ईंट पर रखुमाई के साथ खड़े पांडुरंग की आरती।

Describes Pandurang standing on a brick beside Rakhumai at Pandharpur.

मराठीलगभग 2 मिनटVitthal

मूल पाठ Prayer text

युगें अठ्ठाविस विटेवरी उभा । वामांगें रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥ पुंडलिका भेटी परब्रह्म आलेंगा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥ धृ० ॥

जयदेव जयदेव जय पांडुरंगा । रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥ १ ॥

तुळसी माळा गळां कर ठेवून कटीं । कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥ देव सुरवर नित्य येती भेटीं । गरुड हनुमंत पुढें उभे रहाती ॥ २ ॥

ओवाळू आरती कुरवंड्या येती । चंद्रभागे माजीं सोडूनिया देती ॥ दिंडी पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णूं मी किती ॥ ३ ॥

ओवाळूं आरति अनुछत्रपाळा । सोनियाचीं कमळें पद्माळे तळां ॥ राई रखुमाबाई राणिया सकळां । ओवाळीला राजा विठ्ठल सांवळा ॥ ४ ॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती साधुजन येती । चंद्रभागेतीरीं स्नानें जे करिती ॥ दर्शन हेळा मात्रें तया होय मुक्ति । केशवासी नामदेव भावें ओवाळिती ॥ ५ ॥ जय देव जय देव० ॥

स्रोत और संस्करण Sources & edition

Five-verse version in the 1894 Namdev Gatha.

Signed Namdev. Printed in the Namdev Gatha edited by Tukaram Tatya, Bombay, 1894.

Original historical hymn in the public domain. This edition reproduces only the original-language words.